संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचेपुढील १४ वर्षांतील अध्यक्ष नावे निश्चित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

* विद्यमान सरचिटणीस माणिक चव्हाण अध्यक्ष

पुणे – पुण्यातील नामांकित श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी ट्रस्टचे विद्यमान सरचिटणीस माणिक चव्हाण यांची काल एकमताने निवड करण्यात आली. विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरचिटणीसपदी हेमंत रासने यांची नियुक्ती करण्यात आली.विशेष म्हणजे यावेळी पुढील १४ वर्षांसाठी ट्रस्टच्या अध्यक्षांची नावेही निश्चित करण्यात आली.
विश्वस्त मंडळाच्या बैठकीला ट्रस्टचे डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण,हेमंत रासने,अक्षय गोडसे, अमोल केदारी,कुमार वांबुरे, मुरलीधर लोंढे, उत्तमराव गावडे आदी उपस्थित होते. २०२२ ते २०२४ या कालावधीसाठी ही निवड लागू असेल.या काळात अध्यक्षपदी चव्हाण यांच्यासह उपाध्यक्षपदी डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, कोषाध्यक्षपदी महेश सूर्यवंशी,सरचिटणीसपदी हेमंत रासने,उत्सवप्रमुखपदी अक्षय गोडसे, सहचिटणीसपदी अमोल केदारी आणि विश्वस्तपदी कुमार वांबुरे, मुरलीधर लोंढे, उत्तमराव गावडे हे कार्यरत राहणार आहेत. या बैठकीत पुढील १४ वर्षांचे अध्यक्षांच्या नावांची निश्चिती करण्यात आली.त्यानुसार, २०२२ ते २०२४ या काळासाठी ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण, २०२४ ते २०२६ या काळासाठी सुनील रासने, २०२६ ते २०३१ या काळासाठी महेश सूर्यवंशी आणि २०३१ ते २०३६ या काळासाठी हेमंत रासने हे ट्रस्टचे अध्यक्षपद भूषविणार असल्याचा महत्वाचा निर्णय देखील यावेळी एकमताने घेण्यात आला आहे. त्यामुळे पुढील १४ वर्षांसाठी ट्रस्टचे अध्यक्ष निश्चित झाले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami