संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

श्रीलंकन क्रिकेटपटू वृद्धीमान साहाला धमकावणार्‍या पत्रकारावर २ वर्षांची बंदी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

नवी दिल्ली – कसोटी संघातून वगळल्यानंतर भारतीय यष्टिरक्षक वृद्धीमान साहाला एका क्रिकेट पत्रकाराने धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली होती.त्यानंतर आता बोरिया मुजुमदार नावाच्या या पत्रकारावर बीसीसीआयने २ वर्षांची बंदी घातली आहे. या बंदी काळात मुजूमदार यांना कोणत्याही क्रिकेट स्टेडियममध्ये जाता येणार नाही.

त्याचप्रमाणे यासंदर्भात बीसीसीआयने आयसीसीलाही पत्र लिहून पत्रकार मुजुमदार यांना काळ्या यादीत टाकण्याचे आवाहन केले आहे. बीसीसीआयने स्थापन केलेल्या तीन सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आता राज्य क्रिकेट बोर्ड आणि इतर संबधित जबाबदार व्यक्तिंना याबाबतची माहिती देणार आहे.

साहाला व्हॉट्सॲपवर पत्रकार मुजुमदार यांच्याकडून ही धमकी मिळाली होती. ज्याचा स्क्रीनशॉट साहाने सोशल मीडियावर शेअर केला होता. मुजुमदार हे त्याला मुलाखतीसाठी धमकावत होते, असे साहाचे मत आहे. ‘भारतीय क्रिकेटमधील माझ्या योगदानानंतर एका ‘प्रतिष्ठित’ पत्रकाराकडून मला अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतंय. पत्रकारिता इथेच संपते’, असे साहाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.

वृद्धीमान साहाने संभाषणाचा स्क्रीनशॉट काढून ट्विटवर शेअर केलाय. ज्यात पत्रकार मुजुमदार म्हणत आहेत की, ‘तू माझ्यासोबत एक मुलाखत करशील. ते चांगले होईल. निवडकर्त्यांनी केवळ एकाच यष्टीरक्षकाची संघात निवड केलीय. सर्वोत्तम कोण आहे? तू ११ पत्रकारांची निवड करण्याचा प्रयत्न केला, जो माझ्या मते योग्य नाही. सर्वात जास्त मदत करू शकेल अशा एकाची निवड कर. तू कॉल केला नाहीस मी तुझी यापुढे कधीही मुलाखत घेणार नाही आणि मी ते लक्षात ठेवीन.’

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami