कोलंबो – मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेने अत्यावश्यक सेवा वगळता आजपासून 2 आठवडे सर्व प्रकारच्या पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर बंदी घातली आहे. मध्यरात्रीनंतर आरोग्यासारख्या आवश्यक सेवा वगळता इंधन विक्री करण्यास मनाई केली आहे, अशी माहिती श्रीलंका सरकारचे प्रवक्ते बंदुला गुणवर्धन यांनी दिली. श्रीलंका मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातून पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणे अवघड झाले आहे. श्रीलंकेत सध्या 1,100 टन पेट्रोल आणि 7,500 टन डिझेल शिल्लक आहे. ते एक दिवसही पुरणार नाही. श्रीलंकेच्या तेल आणि नैसर्गिक वायू कंपनीने ऑर्डर केलेले पेट्रोल आणि डिझेल श्रीलंकेत पोहोचलेले नाही.