संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी ट्रेन पुन्हा धावणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : काही वर्षांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आकर्षित करणारी ‘वनराणी‘ ट्रेन कार्यान्वित होती. मात्र कालांतराने ही ट्रेन बंद पडली. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशातील सर्वोत्तम ट्रेन या उद्यानात आणली जाईल असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टॅक्सीडर्मी सेंटर, वन्यजीव रुग्णालय आणि कॅट ओरीएंटेशन सेंटर आदी बांधकामांचा लोकार्पण सोहळा आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी राष्‍ट्रीय उद्यान येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी मुनंगंटीवार म्हणाले की, उद्यानात येणाऱ्या लहान मुलांसह प्रत्येकाला अशा ट्रेनचे आकर्षण असते.ही वनराणी सर्व कुटूंबाला एकत्र बांधून ठेवण्याचे आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचे काम करत असल्याने या उद्यानात वनराणी ट्रेन पुन्हा आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील.तसेच, राज्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, डहाणू, ठाणे, अलिबाग, रोहा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आजपासून ८ वन्यजीव रुग्णवाहिका कार्यान्वित करण्यात आल्या असून आज त्याचे लोकार्पण करण्यात आले.दरम्यान,अभिनेत्री रविना टंडन या राज्य शासनाच्या वन्यजीव सदिच्छादूत म्हणून काम करणार असून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांची मदत होणार आहे, असे मुनंगंटीवार यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami