मुंबई – किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुंबईच्या कोर्टाने नोटीस पाठवली आहे. तसेच ४ जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. शौचालय घोटाळ्याच्या आरोपानंतर संजय राऊत यांच्याविरोधात मेधा किरीट सोमय्या यांनी अब्रुनुकसानीची तक्रार मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. १०० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या आरोपांखाली छळ आणि बदनामी केल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर ठेवण्यात आला होता. आता याची दखल कोर्टाने घेतली असून संजय राऊत यांना नोटीस बजावली आहे. तसेच ४ जुलै रोजी कोर्टात हजर राहण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत. स्वतः किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.