संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

संजय राऊतांना दिलासा नाही
कोठडीत 14 दिवसांची वाढ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मुंबईतील गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संजय राऊतांना दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपत होती. मात्र त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 4 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
आज त्यांच्या जामीन अर्जावर तसेच कोठडीबाबत आज एकत्रित सुनावणी पार पडली. 74 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. परंतु आम्हाला अद्याप आरोपपत्राची प्रत मिळालेली नाही, असे संजय राऊत यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. यानंतर संजय राऊत यांना आरोपपत्राची प्रत देण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले. या पुनर्विकासाशी संबंधित मनीलाँड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांचा प्रत्यक्ष सहभाग नसून त्यांनी पडद्याआड राहून काम केल्याचे पुरावे सापडल्याचे ‘ईडी’ने या आरोपपत्रात नमूद केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami