संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

संजय राऊतांना दिलासा नाहीच
19 सप्टेंबरपर्यंत तुरुंगातच मुक्काम

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नसून आज त्यांची कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 सप्टेंबरपर्यंत वाढ केली. त्यामुळे राऊतांना आणखी काही दिवस तुरुंगातच राहावे लागणार आहे.
याप्रकरणी संजय राऊतांना 31 जुलैला ईडीने अटक केली होती. 8 दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. तिथे ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही. त्यामुळे त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात केली. 22 ऑगस्टला त्यांची कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami