संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – आज सकाळी मुंबईच्या वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, मी बऱ्याच दिवसांनंतर शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांच्यासोबत मी एसटी संप आणि इतर राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली. एसटी कामगारांसाठी जे-जे शक्य होईल, ते-ते करण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. एसटी कामगारांना आमची पूर्ण सहानुभूती आहे. एसटी संपात तेल ओतण्याचे काम कोण करतेय, हे सर्वांना माहिती आहे.

संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवतेय? आणि का भडकवतेय? त्यामागील हेतू काय आहे, महाराष्ट्राला आग लावण्याचे प्रयत्न अमरावतीपासून एसटी संपापर्यंत चालले आहेत. काल शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची एसटी कामगारांच्या संपाबाबत चर्चा झाली. या चर्चेत शरद पवारांनी काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत, असे संजय राऊत म्हणाले. परमबीर सिंहांबाबत शरद पवार यांच्यासोबत चर्चा करावी, इतका मोठा आणि गंभीर विषय नाही. राज्यात इतरही महत्वाचे विषय आहेत. त्या विषयांवर शरद पवार यांच्यासोबत चर्चा झाली. आम्ही शरद पवारांसोबत गंभीर विषयावर चर्चा करतो. अशा विषयावर चर्चा करण्यास आम्हालाही वेळ नाही आणि शरद पवारांनाही वेळ नसल्याचे राऊतांनी सांगितले.

Close Bitnami banner
Bitnami