मुंबई- मुंबईतील जे जे रुग्णालयाचे अधीक्षक श्रीमान डॉक्टर संजय सुरासे यांच्या शुभहस्ते गाडगेबाबांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर व संत गाडगेबाबा विचार मंचाचे अध्यक्ष अनिल मेश्राम श्री विवेकानंद पाटील पुण्य प्रतापचे मुख्य संपादक व समस्त पदाधिकारी मंडळी उपस्थित होते जे जे हॉस्पिटल रुग्णालयाचे आरएमओ डॉ राठोड, डॉ दिलिप गवारी,व संत गाडगेबाबा धर्मशाळेचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख, उपस्थित होते धर्मशाळेचे विश्वस्त एकनाथ ठाकूर यांनी संत गाडगेबाबा च्या विषय माहीती सांगितली व सर्व मान्यवरांचे स्वागत व्यवस्थापक अमोल ठाकूर यांनी केले, महाशिवरात्री निमित्त सर्व रुग्ण व नातेवाईकांना उपवासाचा फरळ व फळ वाटप करण्यात आले श्री एकनाथ ठाकूर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले यावेळी धर्मशाळेत जे जे हाॅस्पीटल कंपाऊंड मधील व रुग्ण व नातेवाईक कार्यक्रमाला उपस्थित होते संत गाडगेबाबांच्या भजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली