संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

संभाजीराजेेंचे उपोषण मागे! राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसह इतर अन्य मागण्यांसाठी खा. संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण सुरु केले होते. आज उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने संभाजीराजे यांची आझाद मैदानात भेट घेतली. सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्‍वासन या मंत्र्यांनी संभाजीराजेेंना देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मराठा समाजाच्या सर्व मागण्या राज्य सरकारकडून मान्य झाल्याने एका लहान मुलाच्या हातून फळाचा रस घेत संभाजीराजे यांनी आपण उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजीराजे यांची आज सायंकाळी आझाद मैदानात भेट घेतली. यावेळी त्यांनी संभाजीराजे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. मात्र, आपण लेखी आश्वासनाशिवाय हे उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतली. चर्चेनंतर मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या सरकार मान्य करत असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजेेंना सांगितले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या. ते म्हणाले की, सारथीचं व्हिजन डॉक्युमेंट 30 जूनपर्यंत तयार करणार, सारथीमधील रिक्त पदे मार्च 2022 पर्यंत भरणार, आण्णासाहेब पाटील महामंडळाला अतिरिक्त 100 कोटींचा निधी देणार, गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व वसतीगृहांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करणार, मराठा आरक्षणासाठी गुन्हे दाखल झालेल्या तरुणांचे गुन्हे मागे घेणार. यासाठी गृहविभागाकडून प्रत्येक आठवड्यात बैठक घेण्यात येणार, मराठा आंदोलनात मृत पावलेल्या नातेवाईकांना एसटी महामंडळात 18 जणांना नोकरी देण्यात आली आहे, इतरांनाही ताबडतोब नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांचावर गुन्ह्यांमध्ये सहभाग नव्हता त्यांच्यावरील देखील गुन्हे मागे घेण्याबाबत केस टू केस प्रकरण निहाय निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर असे जे गुन्हे मागे घेतलेले आहेत परंतू न्यायालयीन पटलावर प्रलंबित आहेत त्याचा आढावा घेऊन त्याचा निर्णय घेण्यात येईल.

आंदोलनात मृत पावलेल्या मराठा समाजाच्या व्यक्तींच्या कागदपत्रांची पूर्तता करून नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. कोपर्डी खून खटल्याप्रकरणी हायकोर्टात दाखल अपिलाची सुनावणी तातडीनं घेण्याची हायकोर्टात मेन्शन करणार, रिव्ह्यू पिटिशनची सुनावणी खुल्या न्यायालयात घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात पंधरा दिवसात अर्ज करणार, सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणातून सुधारित एसईबीसी, ईडब्ल्यूएस शासकीय सेवेतून बाहेर पडतील अशा निवड झालेल्या पण नोकरीपासून वंचित आहेत, अशा सर्वांना नोकरीत सामावून घेण्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करुन त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवणार, असे सरकारने दिेलेले आश्‍वासन शिंदे यांनी संभाजीराजेेंना वाचून दाखवले. त्यानंतर या तिन्ही मंत्र्यांनी संभाजीराजेंना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मागण्या मान्य झाल्याने संभाजीराजे यांनी लहान मुलाच्या हस्ते फळाचा रस पिऊन उपोषण सोडले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami