नवी दिल्ली – संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी महागाई, बेरोजगारी आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग कोट्यासह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी केली.
केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीत सर्व प्रमुख पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ४७ पैकी ३१ पक्षांनी भाग घेतला. आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास