संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

सचिन तेंडुलकरला वाढदिवसाची भेट
वानखेडे स्टेडियमवर उभारणार पुतळा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

*मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निर्णय

मुंबई :भारतासाठी खेळताना ज्या मैदानात सचिन तेंडुलकरने यशाची अनेक शिखरे गाठली त्या वानखेडे स्टेडियममध्ये आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा भव्य दिव्य पुतळा बसवला जाणार आहे. क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती घेतल्यानंतर १० वर्षांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने हा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष अमोल काळे यांनी एका वृत्तसंस्थेला दिली.

२४ एप्रिलला, तेंडुलकरच्या ५०व्या वाढदिवसाला किंवा यंदाच्या विश्वचषकादरम्यान या पुतळ्याचे अनावरण केले जाईल, अशी माहिती सध्या समोर येत आहे. आज, वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर आणि एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे, पुतळा कुठे स्थानापन्न करायचा हे पाहण्यासाठी पोहोचले असल्याचे समजते.

वानखेडे स्टेडियमवर सध्या सचिन तेंडुलकरच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी आहे. आता याच स्टेडियमवर मास्टर ब्लास्टरचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनन कडून सचिनच्या ५० व्य वाढदिवसानिमित्त ही कौतुकाची भेट असले असे अमोल काळे यांनी यावेळी सांगितले.तीन आठवड्यांपूर्वीच सचिनने यासाठी परवानगी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या