सचिन तेंडुलकर, नीरज चोप्रा, पीव्ही सिंधु येणार हसवायला

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

‘वन माईक स्टँड सीझन 1’ ने कॉमेडीची नवीन संकल्पना जन्माला आणली. स्टँडअपवर हात आजमावण्यासाठी जीवनाच्या विविध क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींना एकाच छताखाली आणणे हे एक कठीण काम वाटू शकते, परंतु पहिल्या सीझननंतर, दुसऱ्या सीझनला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. कल्पनेपासून ते मेंटॉर्स आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वांना या सोबत जोडून घेणे, हे सर्व यशस्वीपणे हाताळत या शोने स्टँड अप कॉमेडीमध्ये नवे परिमाण सेट केले आहेत. या शोचे निर्माते सपन वर्मा या शोचे यश पाहून प्रभावित झाले आहेत आणि त्यांनी या संकल्पनेबद्दलच्या त्यांच्या खऱ्या भावना व्यक्त केल्या.

सपन वर्मा स्पष्ट करतात कि, “वन माइक स्टँडला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. सीझन 1 ला मिळालेला प्रतिसाद थक्क करणारा होता कारण कोणीही सेलिब्रिटींनी स्टँडअप कॉमेडी करण्याची अपेक्षा केली नव्हती. पण आता प्रस्थापित फॉर्मेटसह, आम्हाला सीझन 2 आणखी मोठा आणि अधिक चांगला बनवायचा होता आणि आम्ही ते करू शकलो याचा आम्हाला खरोखर आनंद आहे. लोकांना हा शो आवडतो आहे आणि सोशल मीडियावरही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मला वाटते की प्रत्येक वेळी वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांचा समावेश करणे हा शोचा नावीन्यपूर्ण हेतू आहे जेणेकरून एक अनोखी मजेदार कथा आणखी पुढे नेता येईल.”

ते पुढे म्हणाले, “कोणतेही दोन भाग एक सारखे नाहीत आणि आमचे मेंटॉर्स देखील वेगळा दृष्टिकोन घेऊन येतात. अर्थातच आमच्या मनात बरीच मनोरंजक नावे आहेत, परंतु खेळ हे एक क्षेत्र आहे जे आम्ही या वेळी कव्हर करू इच्छितो. कल्पना करा की सचिन तेंडुलकर किंवा पीव्ही सिंधू किंवा नीरज चोप्रा यांसारखे कोणी आले तर त्यांना त्यांच्या प्रवासाबद्दल बोलताना पाहणे आनंददायक असेल. तथापि, एका गोष्टीची खात्री आहे की खूप मजा येईल आणि त्यांचे विनोद तुम्हाला प्रत्येक वेळी हसवतील आणि शो वेळोवेळी चांगला आणि अधिक चांगला होत जाईल.”

‘वन माइक स्टँड’ ही एक आश्चर्यकारकपणे मजेदार आणि प्रशंसित अमेझॉन ओरिजिनल मालिका आहे. करण जोहर, चेतन भगत, रफ्तार आणि फेय डिसोझा, सनी लिओन आणि इतर प्रतिष्ठित व्‍यक्‍तींचा समावेश असलेला हा शो 22 ऑक्‍टोबर रोजी प्रीमियर झाला आहे. या शोचे सूत्रसंचालन सपन वर्मा करत असून सहभागी सेलिब्रिटींना सुमिखी सुरेश, समय रैना, नीती पल्टा, अतुल खत्री आणि अबिश मॅथ्यू या मेंटॉर्सनी मार्गदर्शन केले आहे.

Close Bitnami banner
Bitnami