संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

सततच्या वाढीनंतर आज सोन्याचा दर घसरला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल, तर आता खरेदी करू शकता. कारण मागील काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या सोन्याच्या दरात आज काहीशी घसरण झाली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर आज एप्रिल डिलिव्हरी सोनीच्या दरात 0.31 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली, तर चांदीही 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होती.

एप्रिल डिलिव्हरी सोन्याचा दर आज 0.31 टक्क्यांच्या घसरणीसह 50,170 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. तर, ]चांदी 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह 64,200 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यवहार करत होती. तसेच ऑगस्ट 2022 मध्ये मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता. महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञांच्या मतानुसार, रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावामुळे सोने दरावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये सोन्याच्या किंमती 52000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर जाऊ शकतात. त्यामुळे त्यापेक्षा आता सोने खरेदीचा सुवर्णकाळ आहे, असे म्हणायला हरकत नाही.

दरम्यान, तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक ऍप तयार केले आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या ऍपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारदेखील करू शकता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami