संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

सत्तारांचा दानवेंना पुन्हा दे धक्का! भाजपाचे ४ नगरसेवक शिवसेनेत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद – शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी सोयगाव नगरपंचायत निवडणुकीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना जोरदार धक्का दिला होता. त्यातून ते सावरण्यापूर्वीच सत्तारांनी दानवेंना दुसरा धक्का दिला. भाजपाचे नव्याने निवडून आलेले ४ सदस्य गळाला लावले. ते आता शिवसेनेत प्रवेश करण्याची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे दानवे यांच्या राजकीय अस्तित्वालाच सुरुंग लागला आहे.

शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांनी सोयगावमधील रावसाहेब दानवे यांच्या वर्चस्वाला धक्के देण्यास सुरुवात केली. केंद्रात सत्तेवर असतानाही त्यांनी रचलेल्या डावपेचामुळे सोयगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत १७ पैकी तब्बल ११ जागा शिवसेनेला मिळाल्या. यामुळे दानवे यांना मोठा हादरा बसला होता. त्यातून ते सावरण्यापूर्वीच सत्तारांनी भाजपाचे ४ नवे नगरसेवक शिवसेनेकडे वळवले. त्यामुळे आता सोयगावमध्ये भाजपाला अस्तित्त्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. ही दानवे आणि भाजपसाठी मोठी नामुष्की आहे. भाजपाचे नवनिर्वाचित ४ नगरसेवक शिवसेनेत दाखल झाल्यामुळे आता त्यांच्याकडे केवळ दोन नगरसेवक उरले आहेत. बालेकिल्ल्यात झालेल्या अशा अवस्थेमुळे दानवे यांची पक्षात मोठी नाचक्की झाली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami