नवी दिल्ली- तिहार तुरुंगात बंद अरविंद केजरीवाल सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणी वाढू शकतात. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तक्रारीवरून केंद्रीय गृहमंत्रालयाने तुरुंग व्यवस्थापनाकडून अहवाल मागवला आहे.ईडीशी दावा केला आहे की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये सत्येंद्र जैन तिहार जेलच्या आवारात मसाज करत असल्याचे दिसत आहे. त्यांची कारागृह अधीक्षकांसोबतही त्याची वारंवार बैठका होत असल्याचे दिसून येत आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय जैन तुरुंगात घरी बनवलेले अन्न खात आहे.याच प्रकरणातील सहआरोपीसोबत सत्येंद्र जैन त्याच्या कोठडीत अनेक तास भेटताना दिसत आहे.
ईडीच्या या दाव्यानंतर तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी सत्येंद्र जैन यांना तातडीने दुसऱ्या तुरुंगात हलवण्याची मागणी केली. आदेश गुप्ता म्हणाले की, मनी लाँड्रिंग प्रकरणात गेले ६ महिने तुरुंगात असलेले मंत्री अजूनही दिल्ली सरकारमध्ये मंत्री आहेत. ते तुरुंगातूनच मंत्रालय चालवत आहेत. तुरुंगात सत्येंद्र जैन मुख्य साक्षीदारांना भेटतात. त्यांच्यावर प्रभाव टाकतात. कोर्टात ईडीने आरोप केला आहे की, सत्येंद्र जैन यांची पत्नी पूनम जैन यांना तुरुंगात असलेल्या पतीच्या सेलमध्ये प्रवेश दिला जातो.कारागृहात व्हीव्हीआयपी वागणूक मिळत असलेल्या मंत्री सत्येंद्र जैन यांच्याबाबत केंद्राने दिल्लीच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला आहे. ईडीने या वर्षी मे महिन्यात मनी लाँड्रिंग प्रकरणी जैन यांना अटक केली होती.