संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

सध्याच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा मार्ग कठीण; प्रवीण तोगडिया यांचा इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर – पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकाल 10 मार्चला जाहीर होणार आहे. याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. त्यातही उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बहुमत मिळेल की समाजवादी पक्ष सत्ता स्थापन करेल का या प्रश्नाचे उत्तर देखील मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला नुकसान सहन करावे लागणार आहे. या निवडणुकीत भाजपाचा मार्ग कठीण आहे, अशा शब्दात भाजपला इशारा दिला आहे.

प्रवीण तोगडिया हे मध्य प्रदेशातील बालाघाट येथे एका कार्यक्रमासाठी जाण्यासाठी नागपुरात पोहोचले होते, त्यावेळी बोलत होते. यावेळी बोलताना प्रवीण तोगडिया म्हणाले की, शेतकरी आंदोलनासोबतच, कृषी उत्पादनाला हमी भाव दिला नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज आहेत, याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. युक्रेनमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात उशीर झाला. युक्रेन-रशिया युद्धात भारताने तस्थस्थ राहण्याची भूमिका योग्यच आहे. युक्रेनमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे काम 15 फेब्रुवारीला सुरू करण्याची आवश्यकता होती, मात्र भारताने उशीर केल्यामुळेचे एका विद्यार्थ्यांला आपला जीव गमावला लागला आहे, असे तोगडिया म्हणाले. युक्रेनमध्ये उणे 10 डिग्री तापमानात विद्यार्थी शेकडो किलोमीटर पायी चालत आहे, हे निंदनीय असून विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढण्यासाठी मंत्र्यांनी तिथे जाऊन यंत्रणा राबवावी अशी मागणी ही प्रवीण तोगडिया यांनी केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami