लखनऊ – सपा नेते आझम खान यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना गुरुवारी लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आझम यांना न्यूमोनिया आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मात्र पुढील 48 तास त्यांच्यासाठी अतिमहत्त्वाचे असणार आहेत, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सपा नेते आणि माजी मंत्री आझम खान यांची प्रकृती गुरुवारी अचानक बिघडली. त्यांना तात्काळ लखनऊ येथील मेदांता येथे दाखल करण्यात आले आहे. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे.
आझम खान यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत असले, तरी डॉक्टरांनी पुढील 48 तास त्यांच्यासाठी अत्यंत चिंत्ताजनक आहे. डॉ. राकेश कपूर यांनी सांगितले की, आझम खानच्या रक्त, लघवी, मधुमेह, रक्तदाब, उच्च रक्तदाब, ऑक्सिजन लेवल यासह सर्व आवश्यक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांना क्रिटिकल केअर विभागात दाखल करण्यात आले आहे. आझम खान यांच्या फुफ्फुसात न्यूमोनिया आढळून आला असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. आझम खान सीतापूर कारागृहात असताना त्यांना दोनवेळा कोरोना झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती बरी झाली होती. तेव्हा कोरोनाचा परिणाम फुफ्फुसांवरही झाला होता. यावेळी त्यांना निमोनियात वाढ झाल्यामुळे डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पुढील 48 तास अत्यंत नाजूक आहेत. पाच डॉक्टरांचे पथक कार्यरत आहेत. असल्याची माहिती समोर आली आहे.