संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

सप्तशृंगीचा अभिषेक मूळ मूर्तीऐवजी आता चांदीच्या पर्यायी मूर्तीवर होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

‘ नाशिक – सप्तशृंगी मातेच्या मूर्ती संवर्धनानंतर मंदिर प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.सप्तशृंगी मातेच्या मूर्तीवरून शेंदूर काढण्यात आल्यानंतर आता दररोज होणारा पंचामृत अभिषेक सप्तशृंगी देवी मूर्तीवर होणार नाही, तर पर्यायी व्यवस्था म्हणून देणगीदार भाविकांच्या योगदानातून तयार करण्यात आलेल्या चांदीच्या मूर्तीवर होणार आहे.
सप्तशृंगी देवीचे स्वरूप हे हजार वर्षांपासून असून लाखोच्या संख्येने भाविक दरवर्षी श्री सप्तशृंगी देवीच्या चरणी नतमस्तक होतात. काही दिवसांपूर्वी सप्तशृंगी मातेच्या मूर्ती संवर्धनाने देखभाल प्रक्रियेनंतर ११०० किलो शेंदूर मातेच्या मूर्तीवरून काढण्यात आला होता.त्यानंतर वर्षानुवर्षी डोळ्यात भरलेले सप्तशृंगी मातेचे रूप बदललेले पाहायला मिळाले.त्यामुळे आता भगवतीच्या मूळ स्वरूपाचा जतन व्हायला हवे म्हणून हा निर्णय देवस्थान समितीतर्फे घेण्यात आला आहे.आज नवरात्रोत्सवापासून सप्तशृंगी मातेचे मंदिर दर्शनासाठी खुले होणार असून भगवतीच्या उत्सव मूर्तीवर म्हणजेच चांदी धातूच्या मूर्तीवरच अभिषेक करण्यात येईल अशी माहिती देखील मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
साधारण २५ किलो चांदी धातूची मूर्ती तयार करण्यात आली असून त्यावर पंचामृत महापूजा करण्यात येईल. भगवतीच्या मूळ स्वरूपाला पुन्हा काही इजा होऊ नये किंवा त्यात बदल होऊ नये. वर्षानुवर्ष भाविकांना भगवतीच्या मूळ स्वरूपाचे दर्शन व्हावे, म्हणून प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पंचामृत अभिषेक पूजेच्या नियमात बदल करण्यात आला असून दैनिक स्वरूपात भगवतीच्या मूर्तीवर जो अभिषेक केला जातो.त्यात पाणी, दूध, लोणी,मध, साखर, नारळ पाणी आणि तुपाचा वापर केला जात असायचा. मात्र आता पर्यायी व्यवस्था म्हणून देणगीदार भाविकांच्या योगदानातून साधारण २५ किलो चांदीची मूर्ती तयार करण्यात आली असून त्यावर पंचामृत पूजा महापूजा करण्यात येईल

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami