संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

सबस्क्रिप्शन दर कमी करण्याचा नेटफ्लिक्सचा निर्णय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लॉस अँजेलिस :- जगभरात पाहिला जाणारा ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून नेटफ्लिक्स प्रसिद्ध आहे. तर, आता आणखी नव्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने त्यांचे सबस्क्रिप्शन दर आणखी कमी केले आहेत. काहीच महिन्यांपूर्वी नेटफ्लिक्सने भारतातील सबस्क्रिप्शन दर कमी केले होते. मात्र आता नेटफ्लिक्सचे नवे दर भारतात नव्हे, तर मध्य पूर्व देशांमध्ये स्वस्त झाले आहेत. या भागात कंपनीला त्यांचे युजर्स वाढवायचे आहेत. यासाठी त्यांनी आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये जवळपास ४०० रुपयांपर्यंत कपात केली.

या संबंधित माहिती कंपनीच्या प्रवत्यांकडून देण्यात आली “आम्ही नेहमीच सबस्क्रायबर्सना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्यासाठी प्रत्येक ग्राहक महत्त्वपूर्ण आहे. काही देशांमध्ये आम्ही सबस्क्रीप्शनचे दर कमी करण्याचे ठरवले आहे” असे म्हटले आहे. यानुसार १०० पेक्षा जास्त देशांमध्ये १३ ते ६० टक्क्यांपर्यंत नेटफिक्स सबस्क्रीप्शनच्या किंमती कमी करण्यात येणार आहेत. या देशांमध्ये भारत नसल्यामुळे सध्या आपल्याकडे नेटफ्लिक्सची सुविधा त्याच दरामध्ये उपलब्ध असणार आहे. याआधीही कंपनीने ग्राहकांना सबस्क्रीप्शनमध्ये सवलती दिल्या होत्या. नेटफ्लिक्सचे जगभरामध्ये सध्या २३० हून अधिक दशलक्ष सबस्क्रायबर्स आहेत. असे असूनही कंपनीला आशिया आणि आफ्रिका खंडातील काही देशामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या