पुणे – ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटेंची प्रकृती पुन्हा बिघडली असल्यामुळे त्यांना पुन्हा पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांचा मुलगा अनिकेत आमटे यांनी दिली. रुग्णालयात सर्व व्हिजिटर्सना प्रवेश बंद केला आहे.
तसेच, डॉक्टरांना फोन लावू नका, वेळोवळी डॉक्टरांकडून अपडेट कळवले जातील, रुग्णालयात खाली रजिस्टर ठेवले आहे. त्यावर आपण शुभेच्छा संदेश, नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहावा. भेटीची अपेक्षा आणि आग्रह करू नये, असे अनिकेत आमटे यांनी म्हटले. 13 जूनदरम्यान आमटे हे बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी पुण्यात आले असता त्यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवला. म्हणून त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. न्युमोनिया बरा झाल्यानंतर आता कर्करोगावरील उपचारांसाठी त्यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.