- पहिल्या टप्प्याचे मोदींच्या हस्ते 11 डिसेंबरला लोकार्पण
- 19 टोलनाक्यांची उभारणी मुंबई
- मुंबई – समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या 520 किमी टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबरला करणार असून नागपूर ते शिर्डीचा पाच तासांचा प्रवास करण्यासाठी 900 रुपये टोल भरावा लागणार आहे. या टप्प्यात 19 टोलनाक्यांची उभारणी करण्यात आली आहे.
- मुंबई ते नागपूर अशा 701 किमीच्या समृद्धी महामार्गाचे काम करण्यास विलंब झाल्याने जितका मार्ग पूर्ण झाला आहे. तितका सुरु करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. नागपूर ते शिर्डी अंतर केवळ पाच तासांत पार करता येणार आहे. मात्र या प्रवासासाठी 520 किमी प्रवाशांना 900 रुपये टोल भरावा लागणार आहे. टोलसाठी नियमानुसार 1.73 रुपये प्रति किमी असे दर निश्चित करण्यात आले आहेत. जितका किमी प्रवास तितका टोल वसूल करण्यात येणार असून यासाठी प्रत्येक एक्झिट पॉइंटवर टोलनाके कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यानुसार 520 किमी अंतरात 19 टोलनाके उभारण्या आलेत. 1.73 प्रति किमीप्रमाणे 520 किमी प्रवासासाठी प्रवाशांना अंदाजे 900 रुपये मोजावे लागणार आहेत.