बुलढाणा- समृद्धी महामार्ग दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. याच समृद्धी मार्गावर आज रविवारी सकाळी सिंदखेड राजा ते दुसरबीड दरम्यान कारचा भीषण अपघात झाला. यात सहा जण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे समजते.समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून ४० हून अधिक अपघात झाले असून हा त्यातील सर्वात गंभीर अपघात मानला जात आहे.
या अपघातातील मृतांची नावे – हौसाबाई भरत बर्वे (६५), श्रद्धा सुरेश बर्वे (२८), किरण राजेंद्र बोरुडे (२८), प्रमिला राजेंद्र बोरुडे (५२), भाग्यश्री किरण बोरुडे (२५), जान्हवी सुरेश बर्वे (११) सर्व रा़ एन ११ हुडको, छत्रपती संभाजीनगर अशी आहेत. जखमींमध्ये कार चालक सूरेश भरत बर्वे (३५), नम्रता रविंद्र बर्वे (३२), इंद्र रविंद्र बर्वे (१२), साैम्य रविंद्र बर्वे (४ ), जतीन सुरेश बर्वे (४), वैष्णवी सुनील गायकवाड (१९), यश रविंद्र बर्वे (१०) आदींचा समावेश आहे़.
समृद्धी महामार्गावर मेहकर ते सिंदखेड राजा दरम्यान लोणार तालुक्यातील शिवणी पिसा येथे आज इर्टिगा कारला भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण जागीच ठार झाले.तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना मेहकर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतांश जखमी तसेच मृत हे छत्रपती संभाजीनगरमधील एन- ११येथील रहिवाशी असल्याची माहिती आहे. हा अपघात लोणार तालुक्यातील शिवणी पिसा ते दुसरबीड दरम्यान झाला.भरधाव वेगातील इर्टिगा रस्त्यावरील डिव्हायडरला जाऊन धडकली आणि गाडी तीन ते चार पलट्या मारून दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर उलटली. या अपघातामध्ये चार जण घटनास्थळीच ठार झाले तर दोन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.