संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

सरपंच करण्यासाठी ४ लाख दिले! शिवसेना खासदारांचा व्हिडीओ व्हायरल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली मेहकर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीवरून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये  कलगीतुरा रंगला आहे. बुलढाण्याचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचा एक व्हिडीओ सध्या जिल्ह्यात व्हायरल होत आहे. यात प्रतापराव जाधवांनी सरपंच पदाच्या निवडणुकीत एक सदस्य कमी पडत असताना माजी मंत्री सुबोध सावजी यांचे चिरंजीव व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांना चार लाख रुपये देऊन एक सदस्य दिल्याचं या व्हिडीओत खासदार प्रतापराव जाधव हे तिथं बसलेल्या कार्यकर्त्यांना सांगत असल्याचा
हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामुळे मात्र प्रतापराव अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डोनगाव येथे एका कार्यकर्त्यांच्या घरी ईद निमित्त शिरखुर्माचा आस्वाद घेताना गप्पांच्या ओघात खासदारांनी ही बात सांगितली खरी पण त्याठिकाणी बसलेल्या एकाने हा व्हिडीओ तयार केला. मेहकर तालुक्यातील डोनगाव येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत संख्याबळ नसताना शिवसेनेचा सरपंच कसा झाला? असा प्रश्न अनेकांना पडला होता. याचे उत्तर आता खुद्द प्रतापराव जाधवांनी दिलं असून एक सदस्य कमी पडत असताना माजी मंत्री सुबोध सावजी यांचे चिरंजीव व काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांना चार लाख रुपये देऊन एक सदस्य दिल्याचं या व्हिडीओत खासदार प्रतापराव जाधव हे तिथं बसलेल्या कार्यकर्त्यांना सांगत असल्याचं या व्हिडियोत दिसत आहे. दरम्यान, खा.प्रतापराव जाधव यांनी ज्यांच्यावर चार लाख रुपये घेण्याचे आरोप केले ते काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांनी प्रतापराव जाधव यांना आरोप सिद्ध करण्याचं आव्हान दिलं आहे. डोनगाव येथील विठ्ठल मंदिरात येऊन हेच आरोप पुन्हा करण्याचं आव्हान दिले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami