संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 08 August 2022

सर्वसामान्यांना महागाईचा करंट! शिंदे सरकारकडून वीज दरवाढीचा निर्णय

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – महाविकास आघाडी सरकारच्या काळात भरमसाठ वीज बिल आल्यानंतर भाजपाने राज्यभरात आंदोलने केली होती. याच भाजपासह सत्तेत आलेले शिंदे सरकार आता सर्वसामान्यांना विजेचा झटका देणार, असे म्हणावे लागेल. कारण राज्यात विजेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यात वीज बिल दरात वाढ होणार आहे. कोरोना काळात मागील दोन वर्ष याबाबत कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नव्हती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे कळते आहे.

राज्यात नवे सरकार आले की, मागील सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलले जातात. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. सत्तेत आल्या आल्या उद्धव ठाकरेंनी आरेतील मेट्रो कारशेडबाबत घेतलेला निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलला आणि कारशेड आरेतच होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नव्या सरकारकडून २४ तासांच्या आत पर्यावरणप्रेमींना मिळालेला हा मोठा धक्का होता. त्यातच आता वीज दरवाढीच्या निर्णयाने सर्वसामान्यांना धक्का बसला आहे.

कोळसा आयात केल्यानंतरही राज्यातील सातपैकी तीन औष्णिक वीज केंद्रातील कोळशाचा साठा संवेदनशील स्थितीत आहे. त्यामुळे राज्यावर आधीच विजेचे संकट आहे. त्यातच आता विजेच्या दरात १० ते २० टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबईतील बेस्ट वीजच्या १०.५ लाख, टाटा पॉवरच्या ७ लाख, अदानी इलेक्ट्रिसिटीच्या २९ लाख आणि एमएसईडीसीएलच्या २.८ कोटी ग्राहकांना फटका बसणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami