सांगली – महापालिका आयुक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मारुती सुझुकी नेक्साला प्रदर्शनासाठी भाड्याने दिले आहे. यामुळे सराव थांबला असल्याने खेळाडू आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा त्याला विरोध आहे. या निर्णयाच्या विरोधात त्यांनी स्टेडियममध्ये आंदोलन केले. राष्ट्रीय स्पर्धा जवळ आल्या असताना महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे खेळाडूंचे नुकसान होत आहे. म्हणून पालिकेने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
सांगलीचे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम महापालिकेने मारुती सुझुकीला लोन एक्झिबिशनसाठी भाड्याने दिले आहे. त्यामुळे खेळाडूंचा सराव थांबला आहे. याविरोधात भाजपाचे दीपक माने आणि इब्राहिम शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते व खेळाडूंनी आंदोलन केले. आयुक्तांनी मनमानी करून हे स्टेडियम खासगी कंपनीला भाड्याने दिले, असा आरोप त्यांनी केला. मारुतीच्या लोन एक्झिबिशनसमोर त्यांनी आंदोलन केले. महापालिका आयुक्त आणि प्रशासन मुर्दाडपणे आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.