संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

सांगलीच्या शहीद जवान रोमित चव्हाणवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सांगली- जम्मू काश्मीरमधील सोफिया भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान रोमित तानाजी चव्हाण (२४) यांच्या पार्थिवावर आज वाळवा तालुक्यातील शिगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. रोमितचे पार्थिव काश्मीरमधून पुण्यापर्यंत सैन्यदलाच्या विमानाने आणण्यात आले. त्यानंतर आज पहाटे सहा वाजता त्यांचे पार्थिव शिगावमध्ये पोहोचल्यानंतर सकाळी साडेआठ वाजता रोमित चव्हाण यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

काश्मीरमधील सोफिया भागात एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करताना शनिवारी सकाळी रोमित चव्हाण यांच्यासह आणखी एक जवान शहीद झाला होता. रोमित चव्हाण यांना गोळी लागल्याचे समजताच सांगली जिल्ह्यातील शिगाव गावावर शोककळा पसरली होती. रोमित हा तानाजी चव्हाण यांचा एकुलता एक मुलगा होता. लहानपणापासूनच सैन्यदलाचे आकर्षण असल्यामुळे वयाच्या १९व्या वर्षीच तो सैन्यदलात भरती झाला होता. गेल्या वर्षभरापासून तो काश्मीरमध्ये सेवा बजावत होता. दोन महिन्यांपूर्वीच सुट्टीहून परत गेल्यानंतर त्याचे काश्मीरमधील सोफियाँ भागात पोस्टिंग झाले होते. तीन मार्चला त्याचा वाढदिवस असल्याने तो पुन्हा सुट्टीवर येणार होता. पण वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी रोमित चव्हाण यांनी देशासाठी हौतात्म्य आले.

शहीद जवान रोमित चव्हाण यांचे पार्थिव आज सकाळी सहाच्या सुमारास वाळवा तालुक्यातील शिगावमध्ये पोहोचले. पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी, तसेच शहीद जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील हजारोंचा जनसागर लोटला होता. पार्थिव घरी पोचताच रोमितच्या नातेवाइकांनी हंबरडा फोडला. यावेळी अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. रोमित चव्हाण अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात रोमितला अखेरचा निरोप देण्यात आला.बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देत शासकीय इतमामात शहीद जवान रोहित चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami