संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 03 July 2022

सांताक्रुझमध्ये किरीट सोमय्यांवर गुन्हा; भुजबळांच्या बंगला पाहणीमुळे कारवाई?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात सांताक्रुझ ठाण्याच्या पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी १५ दिवसांत पोलिस ठाण्यात हजर होऊन लेखी स्पष्टीकरण देण्यास त्यांना सांगितले आहे. अन्यथा पुढील कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यात त्यांनी छगन भुजबळ यांच्या ९ मजली बेनामी बंगल्याची आपण पाहणी केल्यामुळे ठाकरे सरकारने हा गुन्हा नोंदवला आहे, असा आरोप केला आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ४ सप्टेंबर २०२० रोजी सांताक्रुझ येथील छगन भुजबळ यांच्या बेनामी मालमत्तेची पाहणी केली होती. या प्रकरणात सांताक्रुझ ठाण्याच्या पोलिसांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. कोरोनाचे निर्बंध असताना त्यांनी या पाहणी दौऱ्यात नियमांचे उल्लंघन केले, असे पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याबाबतची नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत पोलिस ठाण्यात हजर राहुन लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. दिलेल्या मुदतीत आपण आपले म्हणणे मांडले नाही तर आपणास काही सांगायचे नाही. असे समजून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सोमय्या यांना पाठवलेल्या नोटिशीत म्हटले आहे. त्यावर ठाकरे सरकारने भुजबळांच्या बंगल्याची पाहणी केली म्हणून हा गुन्हा आपल्यावर दाखल केला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये केला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami