संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

साईधाम रहिवासी संघातर्फे रविवारी चेंबूरमध्ये मोफत आरोग्य शिबीर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – चेंबूरमधील घाटला गाव परिसरात असलेल्या अरविंद पाटीलवाडी क्रमांक- १ मधील साईधाम रहिवासी संघ या सामाजिक संस्थेतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त रविवार २ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

लायन्स क्लब ऑफ चेंबूरच्या विशेष सौजन्याने पार पडणार या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत.मधुमेह, रक्तदाब, ईसीजीसह अन्य शारीरिक आजार तपासणी आणि नेत्रतपासणी यावेळी मोफत करण्यात येणार आहे.तरी परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्या असे आवाहन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami