संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

साई मंदिरात हार व फुलांना बंदी विक्रेत्यांचे शिर्डीत अनोखे आंदोलन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शिर्डी – कोरोना काळात शिर्डीतील साईबाबा मंदिरात फुले, हार आणि प्रसाद नेण्यास बंदी घातली होती. ती अद्याप उठवलेली नाही. हार, फुलांमुळे भाविकांची होणारे आर्थिक लूट थांबवण्यासाठी आणि मंदिराच्या स्वच्छतेसाठी साई संस्थानाने ही बंदी मागे घेतलेले नाही. यामुळे फुल उत्पादक शेतकरी, विक्रेते आणि दुकानदार नाराज आहेत. याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अनोखे आंदोलन केले. त्यात हार व फुल विक्रेते, शेतकरी आणि दुकानदार सहभागी झाले होते. ही बंदी मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.
कोरोनामुळे शिर्डीच्या साई मंदिरात हार, फुले आणि प्रसादाला बंदी होती. मात्र काही महिन्यांपासून कोरोनाचे नियम शिथील झाले आहेत. परंतु त्यानंतरही शिर्डीतील साई मंदिरात हार, फुलांना बंदी आहे. संस्थानाने ती मागे घेतलेली नाही. फुल आणि हरांमुळे भाविकांची होणारी आर्थिक लूट आणि मंदिरात होणारी अस्वच्छता यामुळे विश्वस्त मंडळाने मंदिरात हार आणि फुलांना बंदी घालण्याचा ठराव केला आहे. त्याचा फटका फुल विक्रेते, फुल उत्पादक शेतकरी आणि दुकानदारांना बसत आहे. याच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी अनोखे आंदोलन केले. कोपरगाव ते शिर्डी हे १८ किमीचे अंतर त्यांनी फुलाची टोपली घेऊन पायी पार केले. नंतर बाबांच्या द्वारकामाईसमोर फुले अर्पण करून संस्थानाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या नावाने घोषणा दिल्या. हा ठराव मागे घ्यावा आणि बंदी उठवावी अशी मागणी त्यांनी केली. विश्वस्तांच्या या निर्णयाचा फटका या परिसरातील फुलांची शेती करणारे शेतकरी, फुलांचे विक्रेते, दुकानदार आणि छोट्या-मोठ्या व्यापारांना बसला आहे. त्यामुळे ही बंदी मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिर्डी साई मंदिर परिसरात हार आणि फुलांमध्ये भाविकांची आर्थिक लूट केली जाते. १०० रुपयाचा हार १ हजार रुपयांना, २०० रुपयांचा २,००० रुपयांना विकला जात आहे. हार आणि फुले घेऊन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांच्या हातातून फुले खाली पडतात. ती पायदळी तुडवली जात असल्याने मंदिरात फुलांचा चिखल होतो. त्यामुळे मंदिर साफ करण्यास वेळ लागतो. त्याचा परिणाम भाविकांच्या दर्शन वेळेवर होतो, असे विश्वस्त मंडळाने बंदीचे समर्थन करताना सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami