सातारा – सातारा शहराजवळच्या करंजे गावात शुक्रवारी रात्री १०.३० च्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गावात तणाव पसरला असून तेथे कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
करंजे गावालगतच्या कमानीजवळ २० ते २५ तरुणांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊन हाणामारी झाली. त्यात त्यांनी धारदार शस्त्रांचा वापर केला. रात्री १०.३० च्या सुमारास हाणामारी सुरू झाली. ती बराच वेळ सुरू होती. त्यात दोन्ही गटांचे अनेक जण जखमी झाले. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नंतर त्यांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली