संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

सातारा महागावमध्ये रेल्वेच्या धडकेत म्हशीचा जागीच मृत्यू, ९ म्हशी जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा – साताऱ्यातील महागाव परिसरात पुणे-मिरज रेल्वे मालगाडीच्या धडकेत एका म्हशीचा मृत्यू झाला असून ९ म्हशी किरकोळ जखमी झाल्या.

पुणे-मिरज रेल्वे मालगाडी सातारा रेल्वे स्टेशनजवळ महागावच्या हद्दीतून जात होती. तेव्हा जवळून जाणाऱ्या म्हशींचा कळप रेल्वे मार्गावर आला आणि त्यांना रेल्वेची धडक बसली. यावेळी दोन म्हशी अडकल्या. त्यात एक म्हैस जागीच ठार झाली, तर अन्य ९ म्हशी किरकोळ जखमी झाल्या. यावेळी रेल्वेच्या चाकांमध्ये म्हशी अडकल्याने माल वाहतूक करणारी रेल्वे जागेवर अडकली. मात्र रेल्वे चालकाने प्रसंगवधान दाखवल्यामुळे ९ म्हशींचा जीव वाचला. मोठी क्रेन आणून ठार झालेली म्हैस रेल्वे मार्गावरून बाजूला करून रेल्वे प्रशासनाने रेल्वे मार्ग मोकळा केला. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

दरम्यान, दुसऱ्या घटनेत लोणंद-निरादरम्यान पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेने लोणंदजवळील बाळू पाटलाची वाडी हद्दीत २ वानरांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक वानर गंभीररीत्या जखमी झाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami