संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

सातार्‍यातील 8 पालिका निवडणुकांचा बिगूल वाजला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा – निवडणूक आयोगाने नगरपालिकांच्या प्रारुप रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सातारा, कराड, फलटण, महाबळेश्‍वर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, वाई या 8 पालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. 2 मार्चपासून प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांच्या मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे.

प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 8 पालिकांच्या निवडणुकींच्या हालचाली गतीमान होणार आहेत. या मध्ये अ वर्गातील कराड व फलटण, तसेच क वर्गात महाबळेश्‍वर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, वाई या नगरपालिकांचा समावेश आहे. या मुदत संपलेल्या पालिकांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकांच्या अ,ब,क व ड वर्गवारीनुसार 208 सदस्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना केली जाणार आहे. त्यानुसार दोन मार्चपासून प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला जाणार आहे. जिल्हाधिकार्‍यांकडून प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे 7 मार्च, प्रारुप प्रभाग रचनाजिल्हाधिकारी कार्यालय व पालिकांच्या कार्यालयात व वेबसाईटवर प्रसिध्द करणे 10 मार्च, राज्य निवडणुक आयोग अंतिम प्रभाग रचनेस 1 एप्रिलपर्यंत मान्यता देणार आहे. 5 एप्रिलला जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचना प्रसिध्द करणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami