संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

साताऱ्यात बीफ विक्री करणारी दोन हॉटेल्स सील

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा -सरकारने बीफ विक्रीवर बंदी घातलेली आहे . त्यामुळे बंदी असतानाही बीफ विक्री करणाऱ्या साताऱ्यातील दोन हॉटेल्स नगर पालिकेने आज सील केली आहेत . तसेच या प्रकरणी हॉटेल दोन्ही हॉटेल्सच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साताऱ्यातील सदारबझार भागातील कत्तलखाना येथे बिस्मिल्लाह आणि मदिना या दोन हॉटेल्स मध्ये बीफची विक्री होत असल्याची तक्रार सातारा नगर पालिकेकडे आली होती. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभाग आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन या दोन्ही हॉटेल्सची तपासणी केली . यावेळी तेथे बीफची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांनी हॉटेल मालक बेपारी आणि कुरेशी याना याबाबत विचारणा केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत त्यामुळे पालिकेने हि दोन्ही हॉटेल्स सील करून बीफ प्रतिबंधक कायदयान्वये या दोन्ही हॉटेल्सच्या मालकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे .

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami