संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

सामान्यांना धक्का! मुंबईत सीएनजी, पीएनजी महागले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सामान्य नागरिकांना दसऱ्याच्या तोंडावर मोठा हादरा बसला आहे. सीएनजी ६ रुपयांनी तर घरगुती वापराचा पीएनजी ४ रुपयांनी महागले आहेत. ही दरवाढ सोमवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून महानगर गॅसने लागू केली आहे.

केंद्र सरकारने १ ऑक्टोंबरपासून नैसर्गिक वायूच्या दरात ४० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे आम्हाला सीएनजी आणि पीएनजीची दरवाढ करावी लागली, असे महानगर गॅस कंपनीने म्हटले आहे. सीएनजी ६ रुपये प्रति किलो महागल्यामुळे तो ८६ रुपये किलो झाला आहे. तर घरगुती वापराचा पीएनजी ४ रुपये प्रति युनिट महागला आहे. त्यामुळे पीएनजी ५२ रुपये ५० पैसे युनिट झाला आहे. सीएनजी महागल्याने वाहनचालक तर पीएनजी महागल्याने सर्वसामान्य गृहिणी हैराण झाल्या आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami