संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

सायन, बोरिवलीसह 8 ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – 2 दिवसांपासून देशभरात आयकर विभागाची छापेमारी सुरू असून आज मुंबईतील सायन आणि बोरिवलीसह आठ ठिकाणी आयकर विभागाच्या कारवाई करत जोरदार छापेमारी केली. सायनच्या झोपडपट्टीमध्ये छापा मारलेले ठिकाणी राजकीय पक्षाचे कार्यालय आहे. हा राजकीय पक्ष नोंदणीकृत असला तरी निवडणूक आयोगाची मान्यता नाही. पक्षनिधीच्या नावाखाली करचोरीचा प्रकार आयकर विभागाने उघडकीस आणला आहे.

आज मुंबईतील सायन परिसरातील एका झोपडीवर छापा मारला आहे. फक्त 100 चौफूट असलेल्या झोपडीवर एका पक्षाचे नोंदणीकृत कार्यालय आहे. बँक रेकॉर्डनुसार, या पक्षाला मागील दोन वर्षात 100 कोटींची देणगी मिळाली होती. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पक्षाच्या अध्यक्षाला या व्यवहाराबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने आपणं फक्त नावापुरतं आणि स्टेट्स साठी अध्यक्ष असल्याचे सांगितले. पक्ष निधी आणि इतर व्यवहार हे अहमदाबाद येथील ऑडिटरकडून केले जात असल्याचे त्याने सांगितले. या राजकीय पक्षाने जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी स्वीकारला होता. या निधीसाठी प्रमाणपत्रही देण्यात आले. या प्रमाणपत्रांचा वापर आयकर सवलत मिळवण्यासाठी केला जातो. पक्षाला मिळालेल्या निधीतून 0.01 टक्के रक्कम कापली जात होती. त्यानंतर ऑडिटरने तयार केलेल्या संस्थांमध्ये हा पैसा दिला जात होता. बोरिवलीमध्येही असाच प्रकार समोर आला आहे. बोरिवलीतील एका घरातून एका पक्षाचे कार्यालय संचलित केले जात होते. या पक्षाने विविध व्यक्ती आणि संस्थांकडून 50 कोटींचा निधी घेतला होता. त्यानंतर या पैशांचे वाटप विविध संस्थांमध्ये करण्यात आले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami