संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आणि उद्योजक सायरस मिस्त्री (५४) यांच्या पार्थिवावर आज मुंबईतील वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईतील वाळकेश्वर येथील त्यांच्या सी फेसिंग मॅन्शन येथून त्यांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत पोहोचली. उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.उद्योजक आकाश अंबानी, एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि अनेक कौटुंबिक मित्र सायरस यांना अंतिम निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

उद्योजक सायरस मिस्त्री यांचा रविवारी दुपारी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात निधन झाले. गुजरातमधील उडवाडा येथे बांधलेल्या पारशी मंदिरातून ते मुंबईत परतत होते. महाराष्ट्रातील पालघरजवळ मिस्त्री यांची मर्सिडीज जीएलसी 220 गाडी रस्ता दुभाजकाला धडकली. या अपघातात मिस्त्री आणि त्यांचा मित्र जहांगीर पांडोळे (49) यांचे जागीच निधन झाले. गाडी चालवत असलेल्या महिला डॉक्टर अनायता पांडोळे आणि त्यांचे पती डेरियस पांडोळे हे जखमी झाले. डेरियस पांडोळे हे जेएम फायनान्शियलचे सीईओ आहेत. लक्झरी मर्सिडीज कार ज्यामध्ये सायरस मिस्त्री सुमारे 134 किमी प्रतितास वेगाने प्रवास करत असल्याचे कारच्या शेवटच्या सीसीटीव्ही फुटेजवरून हे उघड झाले आहे. रविवारी दुपारी २.२१ वाजता त्यांच्या गाडीने चारौती चेकपोस्ट ओलांडला होता. अपघाताचे ठिकाण येथून 20 किमी अंतरावर आहे. मर्सिडीज गाडीने हे 20 किमीचे अंतर अवघ्या 9 मिनिटांत पूर्ण केले होते .

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami