संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

सावंतवाडी तालुक्यातील विलवडेत आज सातप्रहराचा हरिनाम सप्ताह

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सावंतवाडी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील विलवडे गावातील प्रसिद्ध श्री देवी माऊली मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही सात प्रहराचा श्री हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.उद्या शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी रमा एकादशीच्या मुहुर्तावर हा हरिनाम सप्ताह साजरा केला जाणार आहे.
या हरिनाम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी ठीक १० देवी पालखीचे मंदिरात आगमन, १०.३० पर्यंत देवीची पूजा आणि ११ वाजता प्रत्यक्ष हरिनाम सप्ताहास सुरुवात होईल.त्यानंतर सायंकाळी ७ वाजता गावातील महिलांची वारकरी दिंडी आणि रात्री ११ वाजता जागर कार्यक्रम होणार आहे.तसेच परवा शनिवारी पहाटे काकड आरती,सकाळी नामवंत बुवांची भजने व सकाळी ११ वाजल्यानंतर सप्ताहाची सांगता,दुपारी १.३० वाजता महाप्रसाद व नंतर देवीचा कौलप्रसाद होणार आहेत. तरी परिसरातील सर्व नागरिकांनी सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रमंडळीसह देवदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन गोपाळ दळवी (कुळकर), महादेव दळवी (स्थळकर), समस्त गावमर्यादा व ग्रामस्थ, देवस्थान समिती यांनी केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami