संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

सावधान! ऑनलाईन वीजबिल भरताना फसवणूक होऊ शकते

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आता अनेकजण वीजबिल ऑनलाईन भरतात. मात्र याचा फायदा काही भामट्यांनी घेतला आहे. महावितरणची खोटी वेबसाईट तयार करून त्याद्वारे लोकांना फसविण्याचे काम सुरू होते. ज्यांच्या वीजबिलाची थकबाकी आहे त्यांना वेबपोर्टलद्वारे मोबाईलवर मेसेज यायचा आणि त्यातील लिंकद्वारे त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा हा धंदा होता. ज्याचा फटका अनेकांना बसला. परंतु आता या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांच्या पथकाने ग्राहकांना बिल भरण्यासाठी आलेले संदेश आणि त्यांना पाठविण्यात आलेल्या लिंकची पडताळणी केली. हे सर्व झारखंड येथून केले जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर सायबर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने रात्रीच्या वेळी छापा टाकून चरकू मंडल या आरोपीला झारखंड येथून अटक केली.

मंडल याने आपल्या साथीदार भामट्यांच्या मदतीने बनावट संकेतस्थळ तयार केले. त्यावरून थकबाकी असलेल्या ग्राहकांना तो एसएमएस पाठवत होता आणि त्यात बिल भरण्यासाठी लिंक दिली जात होती. या लिंकवर क्लिक केल्यावर बनावट संकेतस्थळ सुरू व्हायचे. संकेतस्थळ दिसल्याने ग्राहक ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करीत होते. मात्र हे पैसे महावितरणऐवजी खासगी खात्यामध्ये जात होते. त्यामुळे तुम्ही केवळ वीजबिल नाही, तर कशासाठीही पैसे भरताना वेबसाईट बरोबर आहे का याची खात्री करा.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami