संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

सावध राहा! केवायसीच्या बहाण्याने अभिनेत्रीला १.५ लाखांचा गंडा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मराठमोळ्या अभिनेत्री इला भाटे यांना सायबर चोरांनी सुमारे १.५ लाखांचा गंडा घातला. सिमकार्ड केवायसीच्या नावाखाली त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी त्यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे लक्षात घ्या, कुठेही केवायसी करताना आपण योग्य ठिकाणी आपली माहिती देतोय ना, याची आधीच खात्री करा.

मुंबईतील विलेपार्लेत राहणाऱ्या इला भाटे यांच्या पतीच्या मोबाईलवर २८ फेब्रुवारीला फोन आला होता. एअरटेल कस्टमर केअरमधून राजेश अग्रवाल बोलत असल्याचे सांगत त्या व्यक्तीने सिमकार्डची केवायसी केली नसल्याने मोबाईल बंद होणार असल्याचे सांगितले. त्यावर केवायसीसाठी काय करावे लागेल, असे भाटे यांनी त्याला विचारले. तेव्हा त्यासाठी एअरटेल गॅलरीत जाण्याची गरज नाही. मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून करता येईल, असे त्याने सांगितले. त्यानुसार इला भाटे यांनी पतीच्या मोबाईलवर दोन्ही ॲप डाऊनलोड केले. त्यानंतर क्रेडिट कार्डचा सर्व तपशील भरून १० रुपये पाठवले. पैसे पाठवल्यानंतर केवायसी अपडेट होईल, असे सांगून त्याने फोन बंद केला. त्यामुळे इला भाटे यांना संशय आला. त्यांनी एअरटेल गॅलरीत चौकशी केली. तेव्हा आम्ही कोणताही संदेश किंवा कॉल केला नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी आयसीआयसीआय बँकेत विचारणा केली असता त्यांच्या क्रेडिट कार्डमधून १ लाख ४८ हजार ७६५ रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाल्याचे सांगण्यात आले. नंतर त्यांनी याबाबत विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून ते तपास करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami