सिंगापूर – जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची भरसभेत भाषण करताना हत्या झाली. ही घटना ताजी असतानाच सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लूंग यांना ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. हा ४५ वर्षीय इसम सिंगापूरचा रहिवासी आहे. त्याने वेब पोर्टलच्या फेसबुक पेजवर पंतप्रधानांना धमकी दिली.
सिंगापूरचे पंतप्रधान ली सीन लूंग यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हत्येचा निषेध केला होता. हिंसाचाराचे मूर्खपणाचे कृत्य असे त्यांनी या घटनेचे वर्णन केले होते. आबे आपले चांगले मित्र होते. त्यांच्यासोबत आपण जेवण केले होते. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे, असे त्यांनी शुक्रवारी शोकसंदेशात म्हटले होते. त्यानंतर शुक्रवारी दुपारी ३.१० वाजता त्यांना धमकी आली. त्यानंतर पोलिसांनी एकाला अटक करून त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईल आणि टॅबलेट जप्त केला आहे.