संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

सिंधुदुर्गातील करुळ घाटमार्ग 25 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सिंधुदुर्ग : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सवाचा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे चाकरमान्यांची गावाकडे जाण्याची तयारी सुरु झाली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी गगनबावडा ते कोकणात जाताना लागणाऱ्या करूळ घाटातील संरक्षक भिंत कोसळली होती.या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राला तळकोकणाशी जोडणारा करूळ घाटमार्ग 25 ऑगस्टपर्यंत बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे करुळ घाटात संरक्षण भिंत दरीत कोसळली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलेला आहे.सिंधुदुर्गातील वैभववाडी येथील हा करूळ घाटमार्ग 25 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. कोसळलेल्या ठिकाणी बॅरेल व फलक उभारण्यात आला आहे.दरम्यान या मार्गावरील जड व अवजड वाहतूक फोंडाघाट, आंबोली घाटमार्गे वळविली आहे. गगनबावडा प्रशासनाने बॅरिकेडस्‌ लावून घाटातील प्रवेश बंद केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami