संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

सिंहगडावर सहलीसाठी आलेला कॉलेज युवक हत्ती टाकेत बुडाला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – हवेली तालुक्यातील सिंहगडावर सहलीसाठी आलेल्या बारावीतील कॉलेज युवकाचा गडावरील हत्ती टाकेत बुडून मृत्यू मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी दुपारी घडली. शाहिद मुल्ला असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शेवाळलेल्या दगडावरून पाय घसरून शाहिद हा थेट हत्ती टाकेच्या पाण्यात कोसळला होता.
मृत शाहिद हा मुळशी तालुक्यातील एका कनिष्ठ माध्यमिक विद्यालयात बारावीत शिकत होता.या शाळेतील ६० विद्यार्थी आणि शिक्षक सिंहगडावर रविवारी सहलीसाठी आले होते. दुपारी बाराच्या सुमारास सिंहगडावरील देवटाके आणि हत्तीटाके परिसरात शाहिद आला होता.पावसामुळे इथला परिसर निसरडा झाला आहे. पावसाच्या पाण्याने हत्तीचे टाके पूर्ण भरले आहे.तसेच पावसामुळे टाक्यांच्या परिसरात शेवाळे जमा झाले आहे.शेवाळावरुन शाहिदचा पाय घसरला आणि तो टाकेत पडला. या घटनेची माहिती शिक्षकांनी त्वरीत सिंहगडावरील व्यावसायिकांना दिली. त्यानंतर अमोल पढेर,विठ्ठल पढेर,आकाश बांदल,विकास जोरकर,तुषार डिंबळे,पवन जोरकर, सूरज शिवतारे,राजू सोनार आणि इतर व्यावसायिकांनी लगेच पाण्यात शोधमाेहिम राबवली.अथक प्रयत्नांनंतर शाहिदला पाण्यातून बाहेर काढण्यात आले.त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खेड शिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.या घटनेमुळे सहकारी विद्यार्थी तसेच शिक्षकांना धक्का बसला असून हवेली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami