औरंगाबाद – काही दिवसांपूर्वीच गुजरातमधून सिंह महाराष्ट्रात आणले गेले होते आणि आता औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानातील वाघ हे गुजरातला जाणार आहेत आणि वाघाच्या बदल्यात गुजरात औरंगाबादला कोल्हा आणि इमू देणार आहेत. औरंगाबाद महापालिकेकडून हा प्रस्ताव स्वीकारला असून लवकरच औरंगाबाद सिद्धार्थ उद्यानातील वाघ गुजरातला तर वाघाच्या बदल्यात गुजरात औरंगाबादला कोल्हा, इमूसह आणखी काही प्राणी देणार आहेत. पंधरा दिवसांत प्राण्यांची देवाणघेवाण होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. या उद्यानात पिवळ्या पट्ट्यांचे दहा वाघ सध्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमधील वाघ हे पुण्याचे उद्यान असो वा इतर उद्यान असो ते तिकडे देण्यात आले होते. तर आता औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानातील दोन वाघ हे अहमदाबादच्या कमला नेहरू पार्कच्या प्राणी संग्रहालयाला देण्यात येणार आहेत. त्या बदल्यात औरंगाबादेत कोल्हा आणि इमू हे प्राणी आणि इतर काही प्राणी येणार असल्याचे प्रस्ताव औरंगाबाद महानगर पालिकेने सिविकारला आहे. त्यामुळे आता लवकरच पंधरा दिवसांत प्राण्यांची देवाणघेवाण होणार आहे.
विशेषतः गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमधून वाघाणीचे स्थलांतर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचे मुख्य कारण वाघांची राहण्याची व्यवस्था औरंगाबाद मध्ये कमी पडते. त्यामुळे इथल्या वाघांचे स्थलांतर करण्यात येते. हेच मुख्य कारण आहे की इथले सगळे वाघ आता गुजरातमध्ये जाणार आहेत. आणि गुजरातमधील कमला नेहरू पार्कची शोभा वाढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.