संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

सिद्धिविनायक विश्वस्त मंडळ बरखास्त होण्याची शक्यता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर मंगळवारी शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानाचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले. हे महाविकास आघाडीचे वर्चस्व असलेले विश्वस्त मंडळ होते. त्यानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनाक न्यासाचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या हालचाली सुरु आहेत.या मंडळाचा आणखी दोन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असून मंडळ बरखास्त करण्यासाठी मंत्रीमंडळाची अध्यादेश काढण्याची तयारी सुरु आहे, अशी माहिती समोर येत आहे.

शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिल्यानंतर महाविकासआघाडी सरकारने नेमलेले विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील प्रसिद्ध सिद्घिविनायक मंदिर बरखास्त करण्यासाठी हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत .यासंदर्भात कायदेशीर बाबीसुद्धा तपासल्या जात आहेत.सध्या सिद्धिविनायक न्यासाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आदेश बांदेकर आहेत.सिद्धिविनायक विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे विचार सुरु असून मंडळाचा कार्यकाळ संपण्यासाठी आणखी दोन वर्षांचा काळ शिल्लक आहे. त्यामुळे हे मंडळ जर
बरखास्त करायचे असेल तर मंत्रीमंडळाला अध्यादेश काढावा लागेल.यासाठी शिंदे-भाजप सरकारची तयारी सुरु आहे. तसेच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात नियुक्त करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या शिंदे सरकार रद्द करण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami