नाशिक – सिन्नर शहरातील सर्पमित्राचा पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागाबरोबर स्टंट करत असताना ओठांना दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
नागेश भालेराव अस मृत सर्पमित्राच नाव आहे.नागेश भालेराव हा शहरातील वेल्डींग वर्कशॉपमध्ये तसेच होर्डींग चिकटवण्याचे काम करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होता.शुक्रवारी एका ठिकाणी पकडलेला कोब्रा जातीचा नाग त्याने सिन्नर महाविद्यालयासमोरील मित्राच्या कॅफेमध्ये आणला कॅफेच्यावरती बिल्डींगच्या गच्चीवर जात नागेश याने मित्रांसमोर नागाचे चुंबन घेण्याच्या प्रयत्न केला असता नागाने त्याच्या ओठांना दंश केला.त्यानंतर त्याच्या मित्रांंनी त्याला उपचारांसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपुर्वीच त्याचा मृत्यू झाला.या घटनेमुळे भालेराव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.