संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 21 May 2022

सिलेंडर नको गं बाई! आता चूल पेटवण्यास पसंती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email
Print

मुंबई – एकदा चुलीवरचे जेवण जेवावे, ही शहरातील लोकांसाठी अतिशय हौशीची बाब असते. परंतु ग्रामीण भागात मात्र आजही अनेकांची ही गरज आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे अक्षरश: गगनाला भिडलेले गॅस सिलेंडरचे दर. एका महिन्याला हजारो रुपये देऊन केवळ गॅस सिलेंडर विकत घेणे म्हणजे महिनाभर उपाशी राहण्यासारखेच आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांनी सिलेंडर नाकारून चूल पेटवण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पेट्रोल, डिझेल, सिलेंडरच्या दरांसह महागाई वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार मार्च महिन्यात घरगुती सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ झाली. मग एप्रिलमध्ये कोणतीही दरवाढ झाली नाही, त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला होता, मात्र जरा कुठे श्वास घेतला, तर मेच्या पहिल्याच आठवड्यात पन्नास रुपयांची दरवाढ झाली. परिणामतः आता अनेक भागांत गॅस सिलेंडरचे दर एक हजाराच्या पार गेले आहेत. गोरगरीब जनतेला हा भाव परवडणारा नाही. त्यामुळे आता सबसिडीही मिळत नसल्याने ग्रामीण भागात रानावनात भटकून लाकडाच्या मोळ्यांची साठवणूक केली जातेय. चूल पेटवण्यासाठी लाकडे गोळा केली जात आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami