धनबाद – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि कोळसा चोर यांच्यात जोरदार संघर्ष झाला. त्यावेळी सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात ४ कोळसा चोर ठार झाले असून २ जण जबर जखमी झाले आहेत. धनबाद जिल्ह्यातील कतरास येथील रेल्वे लिंक साईडिंगवर ही घटना घडली. त्यानंतर संतप्त जमावाने आंदोलन सुरू केले.
धनबाद जिल्ह्याच्या कतरास येथील रेल्वे सायडिंगमध्ये काही कोळसा चोर आल्याची माहिती सीआयएसएफला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.३० वाजण्याच्या सुमारास सुरक्षा दलाचे जवान आणि कोळसाचोर यांच्यात संघर्ष झाला. त्यावेळी सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात ४ जणांचा मृत्यू झाला. अन्य दोन जण जबर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर लोकांमध्ये संताप पसरला. त्यांनी आंदोलन केले. संबंधितांवर कारवाई करण्याची आणि नुकसान भरपाईची मागणी केली.