संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

सीएसएमटीत मॅजिक मिरर बसवणार; लोकांना आभासी जग अनुभवता येणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक ११ आणि १२ वर ऑगमेंटेड रियालिटी (एआर) मॅजिक मिरर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवासी आणि पर्यटकांना मोठ्या स्क्रीनवर आभासी जगाचा अनुभव घेता येणार आहे. यात डिजिटल रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक दाखवण्यात येणार आहे. ही सेवा २ महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मध्य रेल्वेचे प्रमुख रेल्वे स्थानक आहे. येथून लोकल आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांची ये-जा सुरू असते. त्यांना या सेवेमुळे आभासी जगाचा अनुभव घेता येणार आहे. यातील करमणूकीत दर महिन्याला बदल केला जाणार आहे. जंगल सफारी, बर्फाळ प्रदेश आणि अन्य आभासी अनुभवाचा यात आनंद घेता येणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या फलाट क्रमांक ११ आणि १२ वर ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी मोठा एलईडी स्क्रीन बसवण्यात येणार आहे. या योजनेच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हा मॅजिक मिरर दोन महिन्यांत प्रवासी आणि पर्यटकांच्या सेवेत येईल, असे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami