संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

सुट्ट्यांमुळे ऑक्टोंबरमध्ये बँका २१ दिवस बंद राहणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- दसरा, दिवाळी, छठ पूजा, भैया दूज, गोवर्धन पूजा असे मोठे सण ऑक्टोंबरमध्ये आले आहेत. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची चंगळ झाली आहे. बँकांना वेगवेगळ्या राज्यांत एकंदर २१ सुट्ट्या आहेत. त्यामुळे या महिन्यात विविध ठिकाणी विविध तारखांना २१ दिवस बँका बंद राहणार आहेत. याशिवाय ६ दिवसांचा लाँग वीकेंड बँक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

१ आक्टोंबर पहिला शनिवार असला तरी आज बँकांचे सामायिक क्लोजिंग आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही. परंतु सामान्यांसाठी आज बँका बंद आहेत. यामुळे बँका २१ दिवस बंद असल्या तरी बँक कर्मचाऱ्यांना २० दिवस सुट्टी आहे. या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या दिवशी आहेत. गांधी जयंती, दसरा, दुर्गा पूजा, दिवाळी, छठ पूजा, भैया दूज, गोवर्धन पूजा असे अनेक मोठे सण आले आहेत. दुसरा आणि चौथा शनिवार आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार आहे. गांधी जयंती रविवारी आहे. ३ ऑक्टोबरला दुर्गा पूजा, ५ ऑक्टोंबरला दसरा, ८ ऑक्टोबरला दुसरा शनिवार, ९ ऑक्टोबरला रविवार, १३ ऑक्टोंबरला करवा चौथ, १४ ऑक्टोबरला रविवार, २२ ऑक्टोबरला चौथा शनिवार, २३ ऑक्टोबरला रविवार, २४ ऑक्टोबरला दिवाळी, २५ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन, २६ ऑक्टोबरला गोवर्धन पूजा व भाई दूज, ३० ऑक्टोबरला रविवार, ३१ ऑक्टोबरला वल्लभाई पटेल जयंती आणि छठ पूजा. त्यामुळे बँकांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी सुट्टी आहे

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami